⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

वनालगत असलेल्या शेतकऱ्यांना सोलर साहित्य वितरण, मुक्ताई-भवानी परीसरातील शेतकऱ्यांचीही मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील वन परिक्षेत्रांतर्गत वनालगत असलेल्या शेतकऱ्यांना आ.चिमणराव पाटील यांच्या हस्ते सोलर साहित्य वितरण करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील प्रस्तावित मुक्ताई भवानी अभयारण्य परीसरातुन देखील शेकडो शेतकरी बांधवांनी लेखी मागणी केली असून वनविभागाकडुन अद्यापर्यत मशीन वाटप केली जात नाहीय, परिणामी तोंडी आलेला हंगाम वन्यप्राणी फस्त करत आहे.

एरंडोल तालुक्यातील विखरण ३०, खर्ची २०, खडके २१ , उमरदे १० असे एकूण ८१ शेतकऱ्यांना सोलर साहित्य वितरण करण्यात आले. हा साहित्य वितरण कार्यक्रम २४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १२ वाजेचा सुमारास येथे घेण्यात आला होता. या प्रसंगी जळगांव वन विभागाचे उपवन संरक्षक विवेक होसिंग, सहाय्यक वन संरक्षक सुदर्शन शिसव, पोपट नाईक , माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शालिग्राम गायकवाड, बबलू पाटील, चिंतामण पाटील, विठ्ठल आंधळे, चंदनसिंग जोहरी, बाळा पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रेय लोंढे आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय हिरामण लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन राजकुमार ठाकरे यांनी तर आभार शिवाजी माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल साळुंखे, विजय माळी, सुरेखा पिंपळे, नंदकुमार क्षीरसागर, दीपक पाटील, कांतीलाल पाटील, अलका पाटील यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, जिल्ह्याभरात वन्यप्राण्यांकडून शेतीपिकांचे नुकसान होत असून असंख्य शेतकऱ्यांची सोलर साहित्याची मागणी होत आहे. तसेच जिल्ह्यातील प्रस्तावित मुक्ताई भवानी अभयारण्य परीसरातुन देखील शेकडो शेतकरी बांधवांनी लेखी मागणी केली असून वनविभागाकडुन अद्यापर्यत मशीन वाटप केली जात नसल्याने तोंडी आलेला हंगाम वन्यप्राणी फस्त करत आहे.