जळगाव लाईव्ह न्यूज । अंदर मावळातील अति दुर्गम अशा भागामध्ये ज्या ठिकाणी सतत पाऊस पडतो. निसर्गाच्या सानिध्यात ,पहाड व वनराईच्या आत असलेल्या पहाडी भागातील शालेय विद्यार्थ्यांन पर्यत गरजेच्या वस्तू पोहोचत नसतात. त्या भागातील विद्यार्थी वर्ग पावसामध्ये भिजत तीन ते चार किलोमीटर पर्यत पायी चालत जातात. याचा अभ्यास करून या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. रेखा भोळे म्हणाल्या आमची संस्था अशा विद्यार्थ्यांना शोधून त्याचा अभ्यास आमच्या संस्थेचे पदाधिकारी करतात.आणि त्यानां ज्या ज्या गोष्टींची आवश्यक ता असते ते पुरवण्याचे कार्य ओम गगनगिरी वर्ल्ड फाउंडेशन च्या माध्यमातून केले जाते.
यावेळी मेटलवाडी शाळेचे सर श्री सुनील धोबे सर म्हणाले या भागातील जास्त पर्जन्यमान लक्षात घेऊन या आदिवासी समाजातील मुलांना रेनकोट व शालेय वस्तू या ज्या प्रकारच्या मदतीची गरज आहे हे देऊन सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन च्या गरजा लक्षात घेऊन त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवल्या बद्दल आपल्या संस्थेचे आभारी आहोत.
यासाठी आम्हाला दानशूर लोकांकडून मदत मिळत असते, नामदेव ढाके, मनोज पाटील, त्याचप्रमाणे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या, महिलांच्या उत्कर्ष साठी नेहमी पुढाकार घेऊन कार्य करणाऱ्या आदर्श अशा बहिणाबाई संस्थेच्या अध्यक्षा सौ विजयाताई जंगले ,त्याचा पदाधिकारी सौ जोत्सनाताई, शुभांगी ताई , सुनीताताई, तसेच बहिणाबाई मंडळातील प्रत्येक महिला भगिनी यांच्या सहकार्याने तसेच अरुणा बऱ्हाटे ,किरण चौधरी, मनीष टोके सर, कु ओम भोळे यांच्या मदतीने तळागाळातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांन पर्यत खरी गरज पोहोचवता आली