जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । एरंडोल तालुका पत्रकार संघ व एरंडोल तालुका औषध विक्रेता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ मार्च रोजी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी एरंडोल बस स्थानक-आगार,पंचायत समिती कार्यालय,तहसिल कार्यालय या गर्दीच्या प्रमुख कार्यालयांमध्ये जाऊन पञकार व औषध विक्रेत्यांनी विनामास्क असलेल्या नागरीक व कर्मचार्यांना गुलाबपुष्प व मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी काहीजणांकडे मास्क असुनही त्यांनी खिशात ठेवलेले आढळुन आले तर विनामास्क नागरीक व कर्मचारी मोठ्या प्रमाणात आढळुन आले. पञकार व औषध विक्रेत्यांनी या मोहीमेत मास्क वापरा,सोशल डिस्टन्सचे पालन करा असे आवाहन केले.
याशिवाय ‘नो-मास्क-नो-एन्ट्री, या योजनेची प्रभाविपणे अंमलबजावणी करावी अशी विनंती संबंधित कार्यालयांच्या प्रमुखांना केली.
प्रमुख कार्यालयांना भेटी दिल्यानंतर शहराच्या मुख्य बाजारपेठेकडे मोहीम वळविण्यात आली. बुधवार दरवाजा,छञपती शिवाजी महाराज चौक,भगवा चौक या ठिकाणी विनामास्क आढळुन आलेल्या नागरीकांना गुलाबपुष्पासह मास्क वितरीत करण्यात आले. या उपक्रमास नागरीकांकडून उत्स्फूर्त प्रतीसाद मिळाला.
या मोहीमेत जिल्हा पञकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील,एरंडोल तालुका औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष कैलास न्याती, किशोर भक्कड, भूषण पाटील, मनोहर पाटील, महेश पाटील, पिन्टू सोनार, उदय पाटील, अजय महाजन हे औषध विक्रेते, पञकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी, उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, सुधीर शिरसाठ, दिपक बाविस्कर, कोषाध्यक्ष कमरअली सैय्यद, कैलास महाजन, शैलेश चौधरी, प्रा.नितीन पाटील, पंकज महाजन, संजय बागड, चंद्रभान पाटील, कुंदन ठाकुर, प्रविण महाजन, मनोहर ठाकुर, रोहीदास पाटील, दिनेश चव्हाण, रतन अडकमोल, देविदास सोनवणे, अजय वाघ इत्यादी सहभागी झाले.
एरंडोल बस आगार व्यवस्थापक व्ही.एन.पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एरंडोल बसस्थानकावरील ध्वनिक्षेपकावरून ‘मास्क नाही तर एस-टी त प्रवेश नाही, अशी सुचना देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.