जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । सावदा येथून जवळ असलेल्या मस्कावद सिम ग्रामपंचयती तर्फे कोरोना काळात लॉकडाउन मुळे अनेकांची रोजीरोटी बंद असताना दिव्यांग बांधव देखील अनेक अडचणीचा सामना करीत आहे. त्यामुळे येथील दिव्यांगजनांना मदतीचा हात देण्यासाठी येथील ग्रामपंचयतीने ग्रामनीधी मधून मदत केली व अनोखा उपक्रम समाजा समोर ठेवला.
ग्रामपंचयती तर्फे गावातील दिव्यांग बांधवांना किराणा सहित्याचे वाटप करण्यात आले तसेच त्यांना घरपट्टी करातून 50% टक्के सूट देखील देण्यात आली.
यावेळी सरपंच सुवर्णा नितिन भोगे, उपसरपंच संजय भारंबे, राहुल फेगडे, समाधान भालेराव, सौ कुसुम सरोदे, स्वाती होले, सौ विद्या फेगडे, सौ ललिता इंगले, ग्रामसेवक बढे आप्पा, पोलीस पाटील व ग्रामसेवक कर्मचारी उपस्थित होते, सर्व दिव्यांग बांधवांना कोरोनाचे नियम पाळून हे साहित्य वाटप करण्यात आले.