⁠ 
रविवार, ऑक्टोबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | एकही लाभार्थ्याला जागा व घरकुलापासून वंचित राहू देणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

एकही लाभार्थ्याला जागा व घरकुलापासून वंचित राहू देणार नाही; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

२०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना उतारे वाटप – उताऱ्यामुळे परमनंट पत्ता मिळाला

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२४ । कुसुंबा येथे दोनशे पेक्षा जास्त बेघरांना त्यांच्या हक्काच्या जागेचे उतारे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उतारे घेतांना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनद ओसंडून वाहत होता. कुसुंबा ते धानवड तांडा या ८ किमीच्या रस्त्यासाठी ८ कोटी ५७ लक्ष निधी मंजूर केला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. ज्यांनी आपलं आयुष्य संघर्षमय परिस्थितीत काढलं, त्यांना आज त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. ही गोष्ट फारच समाधानकारक असून हे उतारे फक्त एक मालकी हक्काचे प्रमाणपत्र नाहीत, तर या व्यक्तींच्या आयुष्यातील एक नवा अध्याय आहेत. अतिक्रमित जागेत रहात असल्यामुळे तुम्हाला उजाड कुसुंबा म्हणत होते आता त्याच उजाड कुसुंबाची उज्वल कुसुंबा म्हणून ओळख होईल. एकही लाभार्थी जागा व घराकुलापासून वंचित राहू देणार नसून उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच त्यांच्या हक्काचे घरे देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते कुसुंबा येथे बेघरांना जागेचे उतारे वाटप व विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

शिवसेनेत प्रवेश व निवड
कुसुंबा व उमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते व सोसायटी संचालक मदनसिंग वना पाटील, ग्यानसिंग पाटील, प्रकाश बाविस्कर, सुरेश पाटील, समाधान हटकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल चिंचोली, उमाळा, धावड, कुसुंबा, पाथरी, लोणवाडी, सुभाष वाडी, वराड, कंडारी, विटनेर, कुसुंबा येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार केला. मदन वना पाटील यांची उपतालुका प्रमुख पदी निवड शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घोषित करून त्यांचा सत्कार केला.

गुलाबभाऊ मुळे आम्हाला परमनंट पत्ता मिळाला
जलजीवन मिशन अंतर्गत फिल्टर प्लांटसह पाणीपुरवठा योजना 9 कोटी, शाळा खोल्या बांधकाम, व्यायाम शाळा साहित्य, व संरक्षक भिंत बांधकाम , ट्रान्सफॉर्मर – 20 लक्ष दिव्यांगांना बॅटरी सायकल, भजनी मंडळ साहित्य ,यासह अनेक विकासाची कामे झालेली असून आज गावं अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण – 70 लक्ष, श्री दत्त मंदीर सभामंडपाचे लोकार्पण – 10 लक्ष, आणि स्वामी समर्थ केंद्राला सभा मंडप – 10 लक्ष भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गुलाबभाऊ मुळे आम्हाला परमनंट पत्ता मिळाला असला असून आमची उजाड गावाची ओळख पुसली जाणार असल्याची प्रतिक्रिया अनेक लाभार्थ्यांनी बोलून दाखविली.

यांची होती उपस्थिती?
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ग्रा. प. सदस्य तथा माजी सैनिक संदीप सुरळकर यांनी केले तर आभार आकाश पाटील यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, महिला आघाडीच्या सरीताताई कोल्हे – माळी, रमेशआप्पा पाटील, जनाआप्पा कोळी, सरपंच यमुनाबाई ठाकरे , उपसरपंच विलास कोळी, ग्रा. पं. सदस्य भारतीताई पाटील, शोभाताई चौधरी कैलास कोळी, अंकुश मोरे, चंदू पाटील, भूषण पाटील, प्रवीण पाटील, निलेश पाटील, आकाश पाटील, शेतकी संघाचे ब्रिजलाल पाटील, संजय घुगे, देविदास कोळी, रवी कापडणे, पी. के. पाटील, राजू पाटील, जितू पाटील, साहेबराव वराडे, डॉ कमलाकर पाटील, रोहित कोगटा, तुषार महाजन, श्याम कोगटा, प्रवीण परदेशी, यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.