जळगाव लाईव्ह न्यूज । आपल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे शैक्षणिक साहित्य हे घेता येत नाही. मात्र, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आपण समाजाचं काही देणं लागतो. या उदात्त भावनेने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शूज वाटप करण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्विय सहायक नवलसिंग राजे पाटील यांना काही तरुण रस्त्यावर अनवाणी धावताना दिसले. त्यावेळेस विद्यार्थ्यांनी नवलसिंगराजे पाटील यांच्याकडे आपल्या भावना मांडल्या. नवलसिंग यांनी विद्यार्थ्यांच्या भावना मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडल्या. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला कुठलीही अडचण येता कामा नये, युवक घडला.. तर देश घडेल.. अशा सूचना नवलसिंग पाटील यांना दिल्या..
या भावनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील फाउंडेशन व मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांच्या माध्यमातून गरजवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे शैक्षणिक साहित्य पद्मालय विश्रामगृह येथे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नवलसिंग राजे पाटील अजय सिंग पाटील प्रफुल पाटील महेश पाटील मनोज पाटील विशाल पाटील माही जाधव परेश पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती