---Advertisement---
जळगाव जिल्हा

रोटरीने दिले गरजू विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ, 80 विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२३ । रोटरीतर्फे गरीब व वंचित विद्यार्थ्यांना उडान कार्यक्रमांतर्गत सायकली देण्याचा उपक्रम म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या त्यांच्या पंखात बळ देऊन त्यांना भरारी घेण्याची संधी दिली आहे, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रतिपादन केले.

rotary

मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे रोटरी परिवार जळगावतर्फे दि.१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या प्रथम महिला प्रांतपाल आशा वेणूगोपाल यांची तर सहप्रांतपाल डॉ.राहुल मयूर, नितीन इंगळे, रोटरी जळगावचे अध्यक्ष मनोज जोशी, रोटरी वेस्टच्या अध्यक्ष सरिता खाचणे, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष कल्पेश शाह, रोटरी गोल्डसिटीचे अध्यक्ष प्रकाश पटेल, रोटरी मिडटाउनचे अध्यक्ष आर.एन .कुलकर्णी, रोटरी ईस्टचे अध्यक्ष संजय शाह, रोटरी इलाईटचे अध्यक्ष अजित महाजन यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

---Advertisement---

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शिक्षणाबरोबर आरोग्यासाठी सायकल अत्यंत उपयोगी आहे. जळगावातील रस्ते विद्यार्थ्यांना सायकली चालविण्यायोग्य म्हणजे खड्डे मुक्त व मोकळे करण्याचा प्रयत्न आहे असे सांगितले. प्रांतपाल आशा वेणूगोपाल यांनी ५५५५ मोफत सायकली देण्यासाठी स्वतः १ कोटी २० लाख रुपये म्हणजे अर्धा वाटा उचललेला आहे, त्यांचे योगदान मोलाचे असून ते सायकलीचे एक चाक आहे असे त्यांनी म्हटले.

प्रांतपाल आशा वेणूगोपाल यांनी उडान उपक्रमाद्वारे सायकली देण्याचे मी व माझ्या पतींनी स्वप्न पाहिले होते. त्यात रोटरी सदस्यांनी सहकार्य केल्यामुळे ही स्वप्नपूर्ती झाली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे. खूप मोठे होऊन तुम्ही ही इतर गरजूंना मदत करा असेही त्यांनी आवाहन केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. राहुल मयूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी प्रेसिडेंट एन्क्ल्यू चेअरमन सतीश मंडोरा, रोटरी सेंट्रलचे सचिव दिनेश थोरात, रोटरी वेस्टच्या सचिव मुनिरा तरवारी, रोटरी गोल्डसिटीचे सचिव मनीष पाटील यांच्यासह शहरातील सर्व नऊ रोटरी क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---