जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । लहान मुले खेळत असताना खेळू नको असे सांगिल्याने, मोठ्यांमध्ये वाद झाला. त्यातून मारहाणीसह विनयभंगाची घटना तळेगाव नवेगाव येथे घडली. या प्रकरणी चाैघांविराेधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला.
तालुक्यातील तळेगाव नवेगाव येथे सोमवारी दि.३० रोजी दुपारी मुले खेळत होती. मुलांमध्ये खेळू नको असे सांगण्याच्या कारणावरून दोन महिलांमध्ये शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर रात्री १० वाजता फिर्यादी महिला व तिचे कुटुंबीय जेवण करून गच्चीवर झोपले असता संशयितांनी घरासमोर येवून शिवीगाळ करीत आराडओरड केली. फिर्यादी महिलेने आरडाओरड का करतात म्हणून विचारणा केली असता चौघांनी फिर्यादी महिलेवर हल्ला करून विनयभंग केला. तसेच त्यांच्या पतीला व सासूला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विशाल शेलार, सुशील शेलार यांच्यासह चौघांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. हवालदार दीपक ठाकूर तपास करत आहेत. मुलांच्या किरकोळ भांडणाच्या वादातून दोन कुटुंबात वाद झाल्यानं, ही घटना घडली. त्यामुळे गावात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. आता या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.