जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । जिल्ह्यात अगोदरवच अशांतता असताना गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास शिवाजीनगर हुडको परिसरात दोन गटात लहान मुलांच्या भांडणावरून वाद झाला. वाद वाढल्याने मोठा जमाव जमून दगडफेक आणि लाठ्याकाठ्यांचा देखील वापर करण्यात आला.

शिवाजी नगर हुडको परिसरात गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाले. लहाण्यांचे वाद मोठ्यांपर्यंत आल्याने दोन्ही गटातील जमाव जमला. एकमेकांना शिवीगाळ केल्याने वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन दगडफेक देखील झाली.
जमावाने मारहाण करताना लाठ्याकाठ्यांचा वापर केला असून अद्यापही त्याठिकाणी मोठा जमाव जमलेला आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून जमावाला पांगविण्याचे काम सुरू आहे.
(बातमी ब्रेकिंग असल्याने सध्या असलेली माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवीत आहोत. काही वेळाने आम्ही बातमी पुन्हा अपडेट करू. जळगाव लाईव्हची ही बातमी रिफ्रेश करून पहा)
हेही वाचा :
- वृद्धेची चेन लांबविणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- जळगावात चुकीच्या दिशेने धावणाऱ्या डंपरने दुचाकीला उडविले ; एक तरुण ठार, दोघे गंभीर जखमी
- जळगावात चाललंय काय? तरुणांच्या टोळक्याकडून घरांवर सशस्त्र हल्ला, वाहनांचीही तोडफोड
- Amalner : मी ‘ऑपरेशन मौत’ जवळ पोहोचलोय…प्रेयसीशी व्हिडीओ कॉल युवकाने उचललं टोकाचं पाऊल
- जळगाव शहर गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरले