⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पारोळा | दिव्यांगाला मागितली लाच, दोघे रंगेहात जाळ्यात

दिव्यांगाला मागितली लाच, दोघे रंगेहात जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । पारोळा तालुक्यातील कंकराज येथील रहिवासी असलेलले ४९ वर्षीय दिव्यांग तक्रारदाराला, दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र ४०% वर वाढवून देण्यासाठी दोघांनी १० हजाराची लाच मागितली होती. मंगळवारी चोपडा उप जिल्हा रुग्णालयात लाच स्वीकारतांना दोघांना रंगे हात अटक करण्यात आली.

पारोळा येथील ४९ वर्षीय तक्रारदार हे दिव्यांग असून, दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र ४०% वर वाढवून देण्यासाठी त्यांना अनिल तुकाराम पाटील (वय-४६) रा. नागरदेवळा याने डॉक्टर माझ्या ओळखीचे असल्याचे सांगत  १० हजाराची लाच मागितली होती. तक्रारदाराने या बाबत लाच लुचपत विभागकडे तक्रार नोंदवली होती. मंगळवारी दुपारी चोपडा उप जिल्हा रुग्णालयात अनिल तुकाराम पाटील याने तक्रारदाराला १० हजारांची लाच मागीतली. लाच स्वीकारल्यानंतर ती विजय रूपचंद लढे, क्य-६७,व्यवसाय-व्यापार रा.नगरदेवळा, यांच्याकडे सोपवली. लाच लुचपत विभागाच्या पथकाने दोघांना सापळा रचून अटक केली.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी,पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.