---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव आगारातून थेट पंढरपूर बस सेवा; उद्या शुभारंभ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । गेल्या दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे जळगाव पंढरपूर बस सेवा खंडित झालेली होती. मध्यंतरीचे कोरोनाचे सावट व एसटीच्या संपामुळे पंढरपूर येथे विठू माऊलीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा हिरमोड होत होता. अनेक एक भाविकांनी याबाबत एसटी महामंडळाकडे पंढरपूर बस सेवा सुरू करण्याबाबत आग्रह धरला होता या अनुषंगाने एसटी महामंडळाकडून जळगाव ते पंढरपूर बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक व इतर घटकांना देय असलेल्या सर्व सवलती या बस सेवेला लागू असल्यामुळे संबंधित प्रवाशांचा प्रवास आनंदमय होणार आहे.

st bus

जळगाव ते पंढरपूर साठी जाणारी ही बस दिनांक 15 जून पासून जळगाव बस स्थानकातून रोज सकाळी ८ वाजता सुटणार आहे तर पंढरपूर हुन जळगाव येणाऱ्या प्रवाशांसाठी सकाळी ५ वाजता बस सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ही बस जळगाव होऊन औरंगाबाद नगर टेंभुर्णी मार्गे पंढरपूर येथे जाईल. या बसचे पंढरपूरचे फुल तिकीट ६९५ असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी ३५० भाडे आकारले जाईल. त्याचप्रमाणे इतर विविध सवलत धारक प्रवाशांना देखील या बस सेवेचा किफायतशीर दरात लाभ घेता येईल. जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घेऊन एसटी महामंडळात सहकार्य करावे असे आवाहन जळगाव आगाराचे आगार व्यवस्थापक पंकज महाजन यांनी केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---