जळगाव लाईव्ह न्यूज । नुकताच महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यानंतर आता पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. पारंपरिक शाखांसह अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण शाखेतील पदविका (पॉलिटेक्निक) शिक्षणक्रमांकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार नाशिक विभागात डिप्लोमाच्या २४,६८० तर जळगाव जिल्ह्यात ३८१७जागा उपलब्ध आहेत; परंतु अद्याप प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली नाही. दोन-तीन दिवसात त्याबाबत नोटिफिकेशन येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दहावीनंतर करिअरचे विविध पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेत. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नेमके भविष्यात काय करायचे या दृष्टीने बहुतांश विद्यार्थी आवडीप्रमाणे क्षेत्र निवडण्यास प्राधान्य देतात. त्यासाठी दहावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त अभ्यासक्रमासह तंत्रनिकेतन, आयटीआय या विविध बाबींचे पर्याय आहेत. ३ वर्षांचा डिप्लोमा झाल्यानंतर विद्याथ्यर्थ्यांना लागलीच विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधीही उपलब्ध असतात. त्यानंतर अभियांत्रिकी पदवी करावयाची असल्यास थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्याची सुविधा आहे. या शिक्षणक्रमाची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबवले जाते. दरम्यान, रोजगारासाठी विविध कंपन्यांशी टाय-अप झाल्याने आयटीआयकडे देखील विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. तसेच आयटीआयनंतर लगेच नोकरीची संधी उपलब्ध होते
जिल्ह्यात दोन ते तीन नवीन आयटीआय सुरू होणार
जळगाव जिल्ह्यात लवकरच नवीन दोन तेतीन आयटीआय सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश सहज मिळेल. तसेच पॉलिटेक्निक विभागाची देखील प्रवेश प्रक्रिया येत्या दोन दिवसात सुरु होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.