जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२२ । आशिया चषक स्पर्धेतील त्यांच्या शेवटच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला.आशिया चषक स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी भारतासाठी हा विजय खास ठरला. या सामन्यात विराट कोहलीने झंझावाती शतक झळकावले. यानंतर भुवनेश्वर कुमारने 5 विकेट घेताच अफगाणिस्तान संघाला बॅकफूटवर ढकलले.
मात्र, या सामन्याच्या शेवटच्या षटकात कर्णधार केएल राहुलने असा निर्णय घेतला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणजे राहुलने दिनेश कार्तिकला 20 वा षटकार टाकायला दिला. मात्र दिनेश कार्तिकच्या एका षटकारात अफगाणिस्तानच्या बल्लेबाजांनी 18 धावा काढल्या. यावेळी पहिल्यांदाच दिनेश कार्तिकची गोलंदाजी दिसून आली.
भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील सुपर 4 मधील पाचवा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात (IND vs AFG) कर्णधार मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीचे शतक आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 20 षटकात 2 गडी गमावून 212 धावा केल्या आणि अफगाणिस्तानला विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या संघाने इब्राहिम झद्रानच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 8 गडी गमावून 111 धावा केल्या.