जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । रेल्वे वॅगनमधून पेट्रोलसह डिझेल चोरीच्या घटनांना काही वर्षांपासून ब्रेक लागला असताना रेल्वे लाईनीजवळ काही कॅनमध्ये डिझेल सापडल्याने खळबळ उडाली. रेल्वे लाईनीजवळ झुडूपांमध्ये डिझेलच्या कॅन असल्याची माहिती सुज्ञ नागरीकांनी माध्यमांना दिल्यानंतर ही बाब रेल्वे सुरक्षा बलाला कळवण्यात आली.
रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त क्षितीज गुरव यांनी तत्काळ सहायक आयुक्त बी.पी. कुशवाह आणि रेल्वे यार्डाचे आरपीएफ निरीक्षक दयानंद यादव यांनी दखल घेण्याची कळवल्यानंतर अधिकार्यांनी पाहणी केली असता डीझेलने भरलेल्या तीन कॅन आणि दोन तुटलेल्या कॅन आढळल्याने त्या जप्त करण्यात आल्या. बुधवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे यार्डात डिझेल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे सुरक्षा बल आयुक्तांनी केली पाहणी
रेल्वे सुरक्षा बल आयुक्त क्षितीज गुरव यांनी डिझेल चोरी प्रकरणानंतर घटनास्थळी भेट दिली. नेमक्या कॅन या भागात कुणी आणल्या याचा शोध घेण्याचे आदेश गुरव यांनी दिले आहेत.