⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | प्रवाशांसाठी खुशखबर : १३ डिसेंबरपासून ‘ही’ मेमू रेल्वे पुन्हा सुरु होणार!

प्रवाशांसाठी खुशखबर : १३ डिसेंबरपासून ‘ही’ मेमू रेल्वे पुन्हा सुरु होणार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । कोरोना (Covid-19) पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून पॅसेंजर (Passenger) गाड्या बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. अशातच धुळे-चाळीसगाव (Dhule-Chalisgaon) दरम्यानच्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १३ डिसेंबरपासून धुळे-चाळीसगाव (Dhule-Chalisgaon)मेमू गाडी (Memu Train) सुरु होणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसातून दोन वेळा या गाडीच्या फेऱ्या होणार आहे. मात्र रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

असे आहे नियोजन

मेमू गाडी क्रमांक 01303 ही चाळीसगाव येथून पहाटे 6.30 निघाल्यानंतर धुळ्यात 7.35 वाजता पोहोचणार आहे तर मेमू गाडी क्रमांक 01313 सायंकाळी 5.30 वाजता चाळीसगाव येथून सुटल्यानंतर 6.35 वाजता धुळ्यात पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात धुळे येथून गाडी क्रमांक 01304 सकाळी 7.50 वाजता सुटल्यानंतर सकाळी 8.55 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे तसेच गाडी क्रमांक 01314 सायंकाळी 7.20 वाजता सुटल्यानंतर रात्री 8.25 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे.

धुळे-चाळीसगाव (Dhule-Chalisgaon)मार्गावर एकही एक्स्प्रेस अथवा पॅसेंजर सुरू नसल्याने सातत्याने पॅसेंजर सुरू करण्याची मागणी होत होती. गोरगरीब, मध्यमवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी व सुरक्षित प्रवास म्हणून या रेल्वे वाहतुकीकडे पाहिले जाते. सोमवार, 13 डिसेंबरपासून मेमू गाडी सुरू करण्याचा निर्णयामुळे चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.