जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । धरणगाव येथील विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालय येथे जनकल्याण समितीच्या रुग्ण साहित्य सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. या काय्रक्रमासास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.किशोर भावे, डॉ.डी.पी.पाटील, जीवन बयस व विनोद कोळी उपस्थित होते. या केंद्रामार्फत गरजू रुग्णांना सेवा तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात आवश्यक साहित्य पुरवले जाईल. यामध्ये कॉट, व्हीलचेअर, वॉकर, एअर बेड, वॉटरबेड, ऑक्सिजन मशीन, कमोड चेअर, काठ्या यांचा समावेश आहे, रुग्णांच्या सेवेसाठी हे उपलब्ध असून गरजू रुग्णांनी संपर्क साधावा, असे आवाहन केद्रप्रमुख सुनील महाजन यांनी केले आहे. यावेळी गावातील डॉक्टर्स, केमिस्ट व अन्य प्रतिष्ठीत उपस्थित होते. काय्रक्रमाचे सूत्रसंचालन सुमीत दुंदेकर यांनी, प्रास्ताविक डॉ. चेतन भावसार यांनी तर आभार प्रदर्शन जनकल्याण सेवा समितीचे जिल्हा सदस्य ललित उपासनी यांनी केले. कार्यक्रमास डॉ.अमृतकर, डॉ.पुष्कर महाजन, डॉ.जितेंद्र पाटील, डाॅ.प्रशांत भावे, प्रा.रमेश महाजन, शिरीष बयस, किरण वाणी, सुधाकर वाणी, जिजाबराव पाटील, महेश आहे.
धरणगाव येथे जनकल्याण समितीच्या वतीने रुग्ण साहित्य केंद्राचे उदघाटन
