⁠ 
शनिवार, मे 4, 2024

महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची मोठी संधी.. 10वी/12वी/पदवीधरांसाठी जम्बो भरती सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येणाऱ्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात विविध पदांसाठी जम्बो भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष 10वी, 12वीसह पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी असणार आहे. DFSL Maharashtra Recruitment 2024

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून पदांनुसार इच्छुक असलेला उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीद्वारे एकूण 125 जागा भरल्या जातील. त्यामुळे इच्छुकांनी वेळ वाया न घालता त्वरित अर्ज करावा.

पदाचे नाव व आवश्यक पात्रता
1) वैज्ञानिक सहाय्यक (गट क) 54
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
2) वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) 15
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law)
3) वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) 02
शैक्षणिक पात्रता :
मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
4) वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) 30
शैक्षणिक पात्रता :
12वी (विज्ञान) उत्तीर्ण
5) वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) 05
शैक्षणिक पात्रता :
12वी (विज्ञान) उत्तीर्ण
6) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) 18
शैक्षणिक पात्रता :
10वी (विज्ञान) उत्तीर्ण
7) व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) 01
शैक्षणिक पात्रता :
i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: ₹900/-]
वयाची अट: 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : https://dfsl.maharashtra.gov.in/

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online