हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातून हजारो भाविक नांदेड कडे रवाना

जानेवारी 24, 2026 10:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या’ हिंद दि चादर ‘श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या समागम वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अंदाजे अंदाजे २ हजाराच्या वर भाविक नांदेड कडे रवाना झाले आहेत.

hindi the chadar

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी एरंडोल येथे भाविकांच्या बसला हिरवा झेंडा दाखवून नांदेड कडे मार्गस्थ केले. तसेच प्रत्येक तालुक्यात उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत भाविकांच्या बस नांदेड कडे रवाना झाल्या.

Advertisements

नांदेड येथे जाणाऱ्या भाविकांमध्ये जामनेर चाळीसगाव,रावेर,पारोळा, जळगाव ,एरंडोल, अमळनेर, पाचोरा, चोपडा,भडगाव,धरणगाव या तालुक्यातून भाविक बस, खाजगी वाहन,रेल्वे द्वारे नांदेड कडे रवाना झाले. काही तालुक्यांमध्ये सेवाभावी संस्थांच्या मदतीने हे भाविक कार्यक्रमासाठी रवाना झाले असल्याची माहिती प्रशासन कडून प्राप्त झाली आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now