जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२३ । शिंदे गट महाविकास आघाडी सरकारमधून उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडला. मात्र हे सगळं मिशन सोपं नव्हतं असं आता मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ४० आआमदार उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडले. १७-१८ ची संख्या ५० पर्यंत येऊन पोहचली त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. मात्र हे सगळं मिशन सोपं नव्हतं असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
आमच्या मागे चामुंडा मातेचा आशीर्वाद होता. अनेक लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठिशी होते. नाहीतर हे सगळं विचार करून पाहा सोपं आहे का? शिवसेनेसारख्या पक्षातून ४० लोकं बाहेर पडत आहेत. उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडत आहेत. त्यांच्या सरकारला कंटाळून बाहेर पडले. मात्र हे लोक आले, एकनाथ शिंदेंच्या पाठिशी उभे राहिले. अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी होते. आम्हाला वाटलं होतं की काही खरं नाही मधेच हे मिशन फेल झालं तर कसं काय होईल? ४० लोकं जमा करणं सोपं नव्हतं. पण ते सोपं वाटत नव्हतं कारण पुढारी कसे असतात तुम्हाला माहहित आहे. मात्र सगळे आमच्या पाठिशी उभे राहिले असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे स्पष्ट झालं होतं. घडलंही तसंच. २९ जूनला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिला. त्यावेळीही त्यांनी महाराष्ट्राला आणि निघून गेलेल्या आमदारांना भाविक साथ घातली. मात्र त्याचा परिणाम झाला नाही.