⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

‘त्या’ भेटीबद्दल एकनाथराव खडसेंनी केला मोठा खुलासा, म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा पुन्हा भाजपमध्ये (BJP) घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. त्यातच एकनाथराव खडसे यांचे कट्टर विरोधक भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी त्यांच्याबाबत केलेल्या दोन मोठ्या दाव्यानंतर खडसेंच्या घरवापसीची चर्चा होऊ लागली. मात्र त्यावर आता खुद्द खडसे यांनी आपली बाजू मांडली आहे.

होय मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमित शाह यांची भेट घेणार आहे, असं खडसे म्हणालेत. नाशिक मध्ये एका कार्यक्रमात मी देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली. ते म्हणाले पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला कळवतो. मी त्यांना भेटणार आहे, असं खडसे म्हणाले आहेत.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी केलेल्या दाव्यानुसार एकनाथ खडसे हे दिल्लीत गेले होते, तेव्हा अमित शाह (Amit Shah) यांनी त्यांना कार्यालयाबाहेर तीन तास ताटकळत ठेवले. एवढे करूनही अमित शाह यांनी एकनाथ खडसे यांना भेट नाकारली, असे ना.महाजन म्हणाले होते. तसेच नाशिकच्या सभेत एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना आणि मला एक विषय सांगितलं होता. खडसे म्हणाले होते कि आपण तिघं बसू. जे काही आहे ते सगळं मिटवून टाकू…”, असं म्हणत महाजनांनी खडसेंबाबत मोठा दावा केला. त्यावर बोलताना मिटून टाका. असं काही मी बोललोच नाही, असं खडसे म्हणालेत.

आता मिटवायचं काय राहिलं? सर्व प्रकारे तर त्रास देण्याचे सुरूच आहेत. ईडी सुरू आहे. सीबीआय सुरू आहे. या सर्व चौकशींना मी समर्थपणे सामोरं जाणार आहे, असं खडसे म्हणालेत.