दोघे मिळून जिल्ह्याचा विकास करा; पालकमंत्रीपदावरून वाद नको : खडसे
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. यात जळगाव जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहे. आता पालकमंत्रीपदावरून वाद न करता जिल्ह्यासाठी आता डबल इंजिन मिळाल्याने विकास वेगाने व्हायला हवा. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
शिंदे-भाजप सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन पार पडला. यावेळी भावी 18 मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोपनियतेची शपथ दिली. यात शिंदे गटाकडून दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखेपाटील, सुरेश खाडे, विजयकुमार गावित, अतुल सावे आणि रवींद्र चव्हाण यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
जळगाव जिल्ह्यातून जामनेरचे आमदार गिरीश महाजन तर जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील हे देखील मंत्री झाले. यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या चांगल्या कामासाठी आपले सहकार्य करण्याची भूमिका राहणार असल्याचे खडसे म्हणाले.