---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर धरणगाव

Detection : दुकान फोडणारा ‘मिथुन’ एलसीबीच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । जळगाव एलसीबीचे तपासकार्य सध्या जोरात सुरू असून आणखी गुन्हा एलसीबीने उघड केला आहे. पाळधी येथील पत्र्याच्या दुकानाचे कुलूप तोडून मोबाईल व इतर सामानाची चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मिथुनसिंग मायासिंग बावरी रा.कजगाव ता.भडगाव असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

IMG 20221113 222707 jpg webp webp

कजगाव येथील रहिवासी मिथुनसिंग बावरी याने पाळधी येथील मोबाईलच्या दुकानातून मोबाईलसह इतर वस्तूंची चोरी केली असून तो चोरीचा मोबाईल वापरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना मिळाली होती.

---Advertisement---

माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी नेमलेल्या पथकातील हवालदार लक्ष्मण अरुण पाटील, पोलीस नाईक रणजित अशोक पाटील, किशोर राठोड, पोकॉ विनोद सुभाष पाटील, चापोकॉ मुरलीधर सखाराम बारी यांनी चोरट्याचा शोध घेतला. पथकाने मिथुनसिंग बावरी यास कजगाव येथून ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या कब्जातील चोरीचा मोबाईल हॅंडसेट पोलिसांना काढून दिला.

पाळधी येथील चोरीप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला असून पुढील तपासकामी त्याला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---