---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर प्रशासन

उपमहापौर साहेब.. तुम्ही शिवसेनेच्या टेकूवर आहेत, भाजपचाही मान ठेवा!

kulbhushan-patil
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी काल भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर धडक दिली. जळगाव शहरातील नागरिकांमध्ये विशेषतः भाजपप्रेमींमध्ये याविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमहापौर कुलभूषण पाटील हे जुने कट्टर शिवसैनिक असले तरी ते आज शिवसेनेचा टेकू घेऊन उपमहापौर झाले तर आणि भाजपच्या चिन्हावर निवडून आले असल्याने त्यांनी भाजप विसरू नये, अशी चर्चा रंगत आहे.

kulbhushan-patil

उपमहापौर कुलभूषण पाटील हे आज जरी शिवसेनेचे उपमहापौर म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचे नगरसेवक पद अजूनही भारतीय जनता पक्षाचेच आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक पदाचा राजीनामा न देता शिवसेनेत प्रवेश केला आहे. म्हणूनच अशाप्रकारे कुलभूषण पाटील यांनी कार्यालयाच्या दरवाज्यावर धडक देणे ही त्यांची चूकच होती अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.

---Advertisement---

शहर शांत ठेवणे ही त्यांची जबाबदारी तरीही…

कुलभूषण पाटील हे जळगाव शहराचे उपमहापौर आहेत. प्रथम नागरिकनंतर जळगाव शहराची शांतता राखणे त्यांचे कार्य आहे किंबहुना जबाबदारी आहे. मात्र काल ज्या प्रकारचे कृत्य उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले त्यामुळे त्यांच्या पदाच्या गरीमेला लांछन लागल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

स्वतः शिवसैनिक की भाजपवाले हे त्यांनीच ठरवावे

प्रसारमाध्यमांशी बोलताना कुलभूषण पाटील यांनी सांगितले की, गुंडगिरी हा शिवसैनिकांचा स्थायी स्वभाव आहे आणि इतरांनी आम्हाला गुंडगिरी करायला शिकवू नये. मात्र कुलभूषण पाटील हे स्वतः नक्की कोणत्या पक्षात आहेत हे त्यांनी स्वतः तपासण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त होत आहे. काल जेव्हा शिवसैनिक म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर धडक दिली त्यावेळेस ते जळगाव शहराचे उपमहापौर देखील होते. हेच तेव्हा ते बहुदा विसरले असावे.

ज्या ताटात खाल्ले, ते त्याच ताटात थुंकले : दीपक सूर्यवंशी

कुलभूषण पाटील हे नगरसेवक म्हणून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. व त्याचबरोबर त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामाही दिला नाही. अशा वेळेस त्यांनी काल केलेल्या कृत्याबद्दल हेच म्हणता येईल की, त्यांनी ज्या ताटात खाल्लं त्याच थाटात त्यांनी थुंकले अशी संतप्त प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिली आहे.

काल झालेला प्रकार अतिशय खेदजनक : ऍड.शुचिता हाडा

काल झालेला प्रकार अतिशय खालच्या पातळीचा व खेदजनक आहे. त्यांना हव तर त्यांनी इतर पद्धतीने विरोध केला असता मात्र काल जो प्रसंग घडला तो खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक ऍड.शुचिता हाडा यांनी दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---