ब्रेकींग न्यूज ! विमान अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू

जानेवारी 28, 2026 10:00 AM

जळगाव लाईव्ह न्यूज २८ जानेवारी २०२६ । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. अजित पवारांसह सहा जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी समोर आलीय

ajit pawar

नेमकी घटना काय?

Advertisements

अजित पवार हे मुंबईहून एका नियोजित कार्यक्रमासाठी बारामतीला येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरवत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवर वेगाने आदळले. या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात अजित पवार यांचे दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisements

या घटनेची माहिती मिळाताच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, खासदार सुप्रिया सुळे बारामतीकडे रवाना झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) चौकशीचे आदेश दिले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now