भुसावळात 5 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार; विकासकामांचे होणार उद्घाटन
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ शहरात विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार, 5 डिसेंबर रोजी येत आहेत. शहरातील डी.एस.ग्राऊंडवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रम करण्याचे पक्षाने नियोजन केले असून, त्या संदर्भात भुसावळातील नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांच्या अटल निवासस्थानी गुरुवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी शहरातील संपूर्ण रस्त्यांची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना कंत्राटदाराला करण्यात आली. तसेच अमृत योजनेसह शहरातील प्रलंबित कामांचा माजी मंत्री खडसेंनी आढावा घेतला.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील, नगरसेवक अमोल इंगळे, मुकेश पाटील, अॅड.बोधराज चौधरी, किरण कोलते, पुरूषोत्तम नारखेडे, देवा वाणी, वसंत पाटील, दिनेश नेमाडे, किशोर पाटील, रमेश मकासरे, दत्तू सुरवाडे, राजू सूर्यवंशी, रवी सपकाळे, प्रमोद नेमाडे तसेच पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आदींची उपस्थिती होती.