शहरातील दोघांच्या हद्दपारीचे आदेश
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता पोलिस प्रशासनाने उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांतांकडे सादर केले आहेत. त्यावर निर्णय देत गुरुवारी प्रांतांनी गणेश कवाडे व राहूल काेळी या दोघांना प्रत्येकी एक व दाेन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले.
स्थानिक पोलिस प्रशासनाने प्रांतांधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवले होते. या प्रस्तावांवर अंतिम कामकाज हाेऊन शहरातील दोघांच्या हद्दपारीचे आदेश निघाले. त्यात गणेश रमेश कवडे (रा.गमाडिया प्रेस, जुनी जीन, भुसावळ) याला एका वर्ष, तर राहुल नामदेव कोळी (रा.जुना सातारा, मरिमाता मंदिराजवळ, भुसावळ) याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. कवडे विरूद्ध हाणामारी, प्राणघातक हल्ला, शासकीय कामकाजात अडथळा असे ७ गुन्हे, तर राहुल कोळी विरूद्ध जबरी लूट व हाणामारीचे चार गुन्हे आहेत.