जळगाव लाईव्ह न्यूज । धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरी केली जात. धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील १४ जणांना तीन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी यांनी बजावले आहेत.

यासंदर्भात रामानंदनगर पोलिस स्टेशनकडून अहवाल सादर करण्यात आला होता. धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर १४ जणांना शहराबाहेर पाठविण्यासंदर्भात प्रस्तावाला गोसावी यांनी मंजुरी दिली. त्यानुसार दि.१२ ते १५ मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत १४ जणांना शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. होळी व धूलिवंदनाच्या कालावधीत या १४ जणांना शहराबाहेर जावे लागणार आहे.