जळगाव शहर

अपघातग्रस्तांसाठी देवकर रुग्णालय ठरले आशेचा मोठा किरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । जळगाव येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय हे अपघातग्रस्तांसाठी आशेचा किरण ठरले आहे. आतापर्यंत अपघातातील अनेक गंभीर रुग्णांना या ठिकाणी जीवदान मिळाले आहे.

अपघात कुठेही, केव्हाही कसाही होवो, अपघातग्रस्तांना वाचविण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरू होते. अशावेळी देवकर रुग्णालय हे आशेचा किरण ठरत आहे. कितीही गंभीर रुग्ण असला, तरी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारी निष्णात डॉक्‍टरांची टीम या ठिकाणी 24 तास उपलब्ध आहे. अशा रुग्णांचे कोणत्याही प्रकारचे हाडांचे फ्रॅक्चर, अॉपरेशन किंवा मेंदूला मार लागलेला असला, तरी देवकर रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात. यामुळे अनेक रुग्णांचा जीव आजपर्यंत वाचला आहे.

रुग्णालयात असलेले प्रशस्त आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक निष्णात डॉक्टरांची 24 तास सेवा उपलब्ध आहे. प्रत्येक रुग्णाची वैयक्तिकरित्या काळजी घेतली जात असल्याने गंभीर रुग्णांना वाचविणे देखील येथे शक्य होत आहे.

आतापर्यंत अपघातग्रस्तांवर झालेल्या बहुतांश शस्त्रक्रिया या शासकीय योजनेत बसत असल्याने त्यांच्यावर अगदी मोफत उपचार केले गेले आहेत. ज्या शस्त्रक्रिया योजनेत बसत नाहीत, त्या शस्त्रक्रिया अत्यंत माफक दरात केल्या जात आहेत. त्यामुळे देवकर रुग्णालय हे अपघातग्रस्तांसाठी मोठा आशेचा किरण ठरले आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button