---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला ; जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी डेंग्यूच्या साथीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य प्रशासनाने फिल्डवर जात शर्तीचे प्रयत्न करावेत‌. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

Dengue ayush prasad jpg webp

डेंग्यू बाधित रुग्ण संख्येबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य यंत्रणेने नियोजन करून डेंग्यूचे रुग्ण कमी करण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी दिले आहेत. डेंग्यूमुळे बाधीत रुग्णांच्या उपचाराकडे लक्ष देण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या आहेत. असे नमूद करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, घराच्या परिसरातपाणी साचू देऊ नका, डबक्याच्या स्वरुपात जमा झालेले पाणी प्रवाहीत करावे, अथवा त्यावर माती टाकून खड्डे बुजविण्यात यावेत, ही कार्यवाही ग्रामपंचायत, नगरपालिका , महानगरपालिकाद्वारे करण्यात यावी. कायमस्वरुपी पाण्याचा स्त्रोत असलेली ठिकाणे परंतू जिथे स्वच्छ पाणी साचून आहे. अशी ठिकाणे उदा. नदी, नाले, तलाव, विहीरी यात प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे गप्पी मासे सोडण्यात यावीत.

---Advertisement---

आशा कर्मचारी यांचेद्वारे सर्वेक्षण करणेत यावे. डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यात यावी. परिसरात डास निर्मूलनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामपंचायत/नगरपालिका /महानगरपालिका यांचेद्वारे फवारणी करण्यात यावी. फवारणी करतेवेळी खाद्यपदार्थांवर होणार नाही याचीही काळजी घ्यावी. फवारणी प्रसंगी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी मच्छरदाणीचा वापर करावा.शक्य झाल्यास घराबाहेर पडतांना पूर्ण अंगभर कपडे वापरल्यास, डासांमूळे होणारे आजार होण्याचे प्रमाण कमी होईल. भरपूर पाणी प्यावे.अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

श्री. प्रसाद म्हणाले, तापाची लक्षणे जाणवणाऱ्या शंभर टक्के रुग्णांची डेंग्यू आजाराची तपासणी करण्यात यावी. सूचनांचे पालन न झाल्यास दोषींविरुध्द कारवाईचा करण्यात यावी. डेंग्यू साथीचा प्रसार झाल्याचे अतिजोखमीचे २० ठिकाणे तपासणीत निष्पन्न झाली असून या ठिकाणी नागरिकांनी अतिदक्षता बाळगण्याचे जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी आवाहन केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---