कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी निदर्शने
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । कोरोना काळात कोविड १९ विषाणू बाधित रुग्णांची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा सुश्रुषा करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी असलेल्या कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून जोरदार निदर्शने करण्यात आले.
जगभरात कोरोना महामारीने उच्छाद मांडल्याने अत्यंत भीतीचे वातावरण पसरले आहे.कोरोनाची दहशतीने मंत्री,आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी लोकांपासून स्वतःला दूर करून घेतले होते. अशा वेळी कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कंत्राटी स्वरूपात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, कक्ष सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार आदींनी जीव धोक्यात घालून कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णाची सेवा सूश्रुषा केली. मात्र या कोरोना योद्ध्यांना अचानक कमी करण्याचा अन्यायकारक निर्णय शासनाने घेतला. याचा निषेध व्यक्त करत कोविड काळात कोरोना रुग्णाची काळजी घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे या मागणीसाठी कोरोना योद्धयांनी जनक्रांती मोर्चाच्या नेतृत्वात प्रचंड घोषणांच्या निनादात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून न घेतल्यास मंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही – महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचा इशारा
कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाकडे भीतीपोटी जवळचे नातेवाईक सुध्दा जाण्यास घाबरत होते.अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णाची सेवा करणारे कंत्राटी कामगार हे जीवनदायी ठरले. या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची न्याय मागणी दुर्लक्षित झाल्यास महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा संपूर्ण राज्यभरात मोठे जनआंदोलन उभारेल व मंत्र्यांना रस्त्यावर पाय ठेवू देणार नाही असा गर्भित इशारा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी या वेळी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन संपताच कोरोना योद्धयांची बैठक पार पडली. यावेळी संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी कोरोना योद्धयांना मार्गदर्शन करून आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागांवर कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली.
आंदोलनात यांचा होता सहभाग
छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक महानगराध्यक्ष निलेश बोरा ,रमेश सोनवणे,चंदन बिऱ्हाडे,दिलीप सपकाळे, तायडे,फहीम पटेल,सुधाकर पाटील, संजय सपकाळे,चंद्रकांत नन्नवरे,वाल्मीक सपकाळे, यांच्या सह कुंदन माळी, भाग्यश्री चौधरी, मंदाकिनी विंचुरकर, ऐश्वर्या सपकाळे, प्रतिक्षा सोनवणे, नंदा पाटील, फरिदा तडवी, कोमल बिऱ्हाडे, रुकसाना तडवी, ललिता पवार, काजल वाघ, दिपाली भालेराव, आरती मोरे, हेमलता सरोदे, योगिता शिंदे,बापूसाहेब पाटील, धनसामल चव्हाण, सतीश सुर्वे मिलिंद तायडे, महेश खर्चाणे, जितेंद्र वाणी, इरफानोद्दीन शेख,युवराज सुरवाडे, प्रदीप पाटील, सतीश सोनवणे, देवानंद सोनवणे, रमेश वानखेडे, हर्षल देवकर, युगल जावळे, सागर चौधरी, अक्षय जगताप, नाना मगरे, साहेबराव वानखेडे, गौतम सोनवणे, रवींद्र पाटील, पवन शिरसाळे, कमलेश वाणी, जीवन चव्हाण,सतिष सूर्वे, अमोल बाविस्कर, प्रशांत कोळी,चंद्रशेखर पाटील, रामकृष्ण पाटील, प्रेमराज वानखेडे, रामकृष्ण शिंगरे, चेतन जाधव यांच्यासह जिल्ह्यातील कोरोना योद्धयांना आंदोलनात सहभागी झाले होते.