⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | सावदा येथे अरुंद गटारींचे बांधकाम थांबविण्याची मागणी

सावदा येथे अरुंद गटारींचे बांधकाम थांबविण्याची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२१ । सावदा येथील स्टेशन नाक्याजवळ सुरु असलेल्या अरुंद गटारीचे बांधकाम त्वरीत थांबवावे कारण या ठिकाणी पूर्वीपासून पाणी जाण्यासाठी मोठी जागा होती. ती बंद करून अरुंद गटर केल्याने मागील व खोलगट भाग असलेल्या बुधवारा व इतर भागात पाणी साचत आहे व घाणीचे साम्राज्य पसरले असून घरात कीडे घुसत असल्याने या भागातील महिलानी सकाळी पालिका कार्यालय गाठले.

याठिकानी त्यांनी सदर काम थांबवावे व पूर्वी प्रमाणे नाल्याचा पाणी वाहन्याचा असणारा मोठा रस्ता ठेवावा अशी एक मुखीमागणी केली. तसेच याच भागात असणाऱ्या एका ठिकाणी डूकारांचे मोठे शेड उभारले असून या ठिकाणी शहरातील हॉटेल मधील उरलेले शीळे अन्न व मासाहारी पदार्थ टाकलेले असल्याने घाणी अधिकच वाढत आहे.  सदर शेड हटविन्याची देखील मागणी यावेळी महिलांनी केली.  यावेळी महिला पालिकेच्या मुख्यहॉल मध्ये बसून आपल्या मागण्या मांडल्या.

यावेळी विरोधी गट नेते फिरोज खान पठाण, नगरसेवक राजेश वानखेडे, नगरसेविका रंजना भारंबे आदिनी त्यांचे म्हणणे ऐकले तसेच मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी देखील या महिलांचे म्हणणे एकूण स्वत: त्या भागात जाऊन पहाणी केली व लवकरच यावर तोडगा काढू व डूकारांचे शेड बाबत देखील निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. या नंतर महिलांनी सदर बाबतीत लेखी निवेदन दिले. तर मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी देखील लवकरच सदर समस्या सोडऊ असे सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.