⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आ.मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले केल्याने त्यांच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा पुरोहित मंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येवून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी १९ एप्रिल रोजी सांगली येथे एका कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्माचे विवाह पद्धती बद्दल चुकीचे मंत्र म्हणून पुरोहित वर्गाची टिंगल टवाळकी करत जे अकलेचे तारे तोडले. अश्या अज्ञानी माणसाच्या अशा वक्तव्यावर महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयंत पाटील व धनंजय मुंडे हे दोघे ज्याप्रमाणे खळखळून हसत होते. असे वक्तव्य व अशा मंत्र्यांच्या हसण्याच्या कृतीवरून दोन जातीत तेढ निर्माण होऊन हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कडक कारवाई करून कायदेशीरित्या गुन्हे दाखल करावे अश्या मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा पुरोहीत मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. निवेदनावर भूषण मुळे, प्रशांत जोशी, पुरुषोत्तम शुक्ल, चेतन शर्मा, पवन तिवारी, संदीप साखरे, महेश कुलकर्णी, अंकुर देशपांडे, मुकुंदा जोशी, चंद्रकांत जोशी, योगेश जोशी, निखील पंडित, हेमंत जोशी, राजाभाऊ जोशी, प्रदीप जोशी, देवेंद्र साखरे, गिरीश जोशी, विनायक जोशी, वैभव नाईक, यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.

निवेदन देतांना यावेळी अध्यक्ष भूषण मुळे, सचिव अजय जोशी, उपाध्यक्ष पुरूषोत्तम शुक्ल, सहसचिव विजय जोशी, कोषाध्यक्ष अविकुमार जोशी, दीपक भट, योगेश्वर जोशी, राजाभाऊ जोशी, साखरे गुरुजी, गजानन फळे, चेतन शर्मा, पवन तिवारी, अंकुर देशपाडे, मुकुंदा जोशी, चंद्रकांत जोशी, हेमंत जोशी, निखील पंडीत, प्रदीप जोशी, देवेंद्र साखरे, वैभव नाईक, कल्पेश पांडे, योगेश जोशी, देवा काळे यांच्यासह आंदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होती.