जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । पाचोरा भडगाव चे आमदार किशोर अप्पा पाटील आपल्या निवासी कार्यालयात आज शुक्रवारी सर्व पक्ष नेते पत्रकार व्यापारी, मंडी असोसिएशन , कपडा असोसिएशन व इतर व्यापारी याच्या सोबत शहारात वाढती कोरोना रुग्ण संख्या’ ब्रेक द चेन’ किराणा भाजीपाला घेण्यासाठी लोकाची होणारी गर्दी या सर्व मुद्यावर्ती या बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीत पाचोरा तालुका व भडगाव तालुक्यात शहारात 7 दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्या संदर्भात चर्चा झाली. यात कोरोना नागरिकांचा स्पर्श कुठे होतो गर्दी जास्त कुठे होते. नागरिक अनावशक ठिकाणी कोरोना नियम मोडत आहेत का यावर चांगलेच बोलणे झाले तसेस अनेक व्यपाऱ्यांनी ही खंत देखील मांडली की 1.25 वर्षांपासून व्यापार ठप्प झाला आहे. कमाई थोडी आहे घरातील भागवणे सुद्धा अवजड जातं व दुकान खुले दिसलें तर पालिका कर्मचारी हजाराचे दंड ठोठवत आहे कपडा असोसिएशन चे प्रदिपकुमार संचेती याचे म्हणे आहे.
तसेच मंडी असोसिएशन अध्यक्ष अयुब बागवान यांनी सांगितले की भाजीपाला घेण्यासाठी खरंच गर्दी होत आहे पन मंडीची जागा कमी असल्याने व मंडी मध्ये छोट्या मोठ्या 150 ठेले आहे सोसिएल डिसस्टेसिंग नुसार केले तर पूर्ण शहारात ठेले लावावे लागतील आम्हला पण व्यापार करताना अडचण येत आहे तसेच येत्या काही दिवसात आखाजी,रमजान सारखे सण येणार आहेत तर हा जनता कर्फ्यू सरळ 15 तारखेपासून योग्य होईल असे सर्व व्यापारीअसोसिएशन आणि मंडीअसोसिएशन पत्रकार व सर्व पक्ष नेत्याचे म्हणे होते तसेच लसीकरण केंद्राबाहेर सुद्धा गर्दी होत आहे नागरिक नियम पालन करत नाही आहे त्यावर ही लक्ष द्यावे लागेल
आमदार किशोर अप्पा पाटील काय म्हणाले?
पाचोरा भडगाव तालुक्यात कोरोना चे संकट बिकट आहे आपल्याला जनता कर्फ्यू ची गरज आहे व्यापारी बांधवानी जे सहकार्य केले आहे प्रशासनाला त्यांसाठी धन्यवाद आणि पुढेही सहकार्य करावे भाजी मंडी देखील थोडे कोरोना नियम जास्त पाळावे आणि नागरिकांना ठेल्या जवळ गर्दी करू देऊ नये. हिंदू बांधवचा आखाजी हा सण आहे तसेच रमजान देखील आहे तर येत्या सोमवार पासून नव्हे तर 15 मे संध्याकाळी 5 वाजेपासून ते 22 मे रात्री 12 वाजे परियंत सक्तीचा जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. यात सर्व दुकानें मंडी बंद असणार आहे बंद असणार आहे मेडिकल व दूध डेअरी चालू असणार आहे दूध डेअरी सकाळी 6 ते 9 सायंकाळी 6 ते 8 अशी चालु असणार आहे.
यांची होती बैठकीत उपस्थित
शिवसेना तर्फे नगराध्यक्ष छोटू गोहील,प्रवीण ब्राम्हणे, किशोर बारवकर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अझर खान, सुदर्शन महाजन,विकास पाटील, काँग्रेस पक्षा तर्फे अविनाश भालेराव भाजप पक्षा तर्फे मधुभाऊ काटे, सुभाष भाऊ, व व्यापाऱ्यां मध्ये कपडा असोसिएशन चे अध्यक्ष प्रदिपकुमार संचेती व स्वईक सतीशशेठ पटवारी, मंडी असोसिएशन अध्यक्ष आयुब बागवान स्वईक पत्रकार बांधव आणि इतर उपस्थित होते.