गुन्हेजळगाव शहर

तरूणीची सोशल मीडियात बदनामी; गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । एका २८ वर्षीय तरुणीचे अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून अश्लिल फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, जळगाव शहरातील रहिवासी २८ वर्षीय तरूणीचे २६ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान अज्ञात अनोळखी नंबरवरील व्यक्तीने स्वतःची ओळख लपवून तरूणीची बदनामी होईल या उद्देशाने तरुणीला आणि तिच्या वडिलांना अश्लिल व धमकीचे मेसेज टाकले. त्याचप्रमाणे तरुणीचे फोटो डिजीटलच्या माध्यमातून अश्लिल फोटो तयार करून सोशल मीडीयावर टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात मोबाईलधारक विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button