जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । केंद्रातील भाजपा सरकारला ३० मेला 7 वर्ष पूर्ण झाले. या काळात मोदी सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. जनसमान्यांनसाठी अनेक योजना आमलात आणल्या अशा जनहित व देशहीत हा दृष्टीकोण डोळ्यांसमोर ठेऊन काम करत असलेल्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुक्ताईनगर खासदार कार्यालय येथे खासदार रक्षा खडसे यांच्याकडून दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जयपालभाऊ बोदडे जि प समाज कल्याण सभापती जळगाव , प्रफुल्लभाऊ जवरे भाजपा ता.अध्यक्ष, चंद्रकांत भोलाने भाजप सरचिटणीस, यु मो ता.अध्यक्ष अंकुश चोधरी, दत्ताभाऊ पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख यु मो, रहस्य महाजन व मान्यवर उपस्थित होते.