जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोटेरियन ब्रह्मदत्त शर्मा: गोदावरी फाऊंडेशन रक्तपेढी सुरुवातीपासून कार्यरत आहे.
गेल्या 10 वर्षांपासून बँक ऑफ बडोदा, वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी दि.20 जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ भुसावळ, इनरव्हील क्लब भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करते. आतापर्यंत 300 पेक्षा जास्त बॅगचे रक्तसंकलन झाले आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. राजश्री कात्यायनी यांचा सत्कार गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून करण्यात आला.
यावेळी विकास कात्यायनी तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक (व रोटरी क्लब ऑफ भुसावळचे माजी अध्यक्ष) डॉ. एन. एस. आर्विकर हे उपस्थित होते. या कामी रोटरी क्लब ऑफ भुसावळ व इनरव्हील क्लब ऑफ भुसावळच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.