कर्जबाजारी शेतकऱ्याने विष घेऊन संपविले जीवन
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । आंबे ( ता.पाचोरा ) येथून जवळ असलेल्या वडगाव जोगे येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने सतत नापिकीमुळे व डोक्यावरील कर्जाबाजारी पणाला कंटाळून विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष छाजू चव्हाण (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गुरुवारी या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र शुक्रवारी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू ओढवला.
शेतकरी संतोष चव्हाण यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. निसर्गाचा लहरीपणा व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने कोरडवाहू शेती करुन घरसंसार चालवणे कठीण जात होते. चव्हाण यांनी बँक ऑफ महाराष्ट्राकडून १ लाख ७० हजार रुपये कर्ज घेऊन परत उमेदीने शेती करण्यासाठी कंबर कसली. यावर्षी तरी चांगले पिक येईल व सर्व कर्जफेड हाेईल, अशी आशा त्यांनी बाळगली हाेती. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील पिके वाया गेली. कोरडवाहू शेती असल्याने दुबार पीक घेणे शक्य नव्हते. त्यात संतोष यांना योगेश (वय २३), गिरीश (वय १३) वर्षे व भारती (वय १७) यांच्या शिक्षणाचा खर्च तसेच मुलगा व मुलीच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत हाेती. पत्नी निर्मला हीच्या आजारावर उपचारासाठी खर्च झाला होता. उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून कर्ज घेतले.
मात्र शेती व घराचा खर्चामुळे कर्जाचा डोंगर वाढला. घरातील सदस्यांची अडचणीमुळे घुसमट वाढली. ती त्यांना असह्य झाल्याने गुरुवारी सायंकाळी शेतात कुणीही नसताना काहीतरी विषारी द्रव घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार असून शासनाने मदत करावी, अशी मागणी हाेते.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक