⁠ 
रविवार, मे 5, 2024

चिंचपुरा ते पिंप्री दरम्यान झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा ते पिंप्री दरम्यान रोडवर दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली होती. यात एक दुचाकीस्वार जखमी झाला होता, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, त्या जखमीला अखेर मृत्यूने गाठले असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

विजय सुरेश चौधरी (वय ३५ वर्षे रा. बोरखेडा ) असे मयताचे नाव आहे. दि.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास विजय चौधरी हे त्यांची बजाज प्लॅटीना मोटर सायकल (क्रं. MH १९CQ १०४०) हिच्याने मुसळी फाटा येथील कंपनीतून कामावरुन घरी परत जात होते. चिंचपुरा ते पिंप्री दरम्यान रोडवर सांयकाळी ६.३० वाजेच्या सुमारास समोरुन भरधाव वेगात येणारी हिरो पॅशन कंपनीची मोटर सायकल (क्रं. MH १९ CK ७८६१) वरील चालक (नाव गाव माहीत नाही) याने त्याच्या ताब्यातील मोटर सायकल भरधाव वेगात, हयगयीने चालवून विजय यांच्या मोटर सायकलीस कट मारुन त्यांच्या मरणास कारणीभूत ठरला. तसेच अपघाताची खबर न देता पळून गेला. याबाबत मयत विजय चौधरी यांच्या पत्नी राजश्री चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटर सायकल (क्रं. MH १९ CK ७८६१) वरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.हे.काँ. राजेंद्र कोळी हे करीत आहेत.