गुन्हेजळगाव जिल्हा

जळगावात विवाहितेचा ह्रदयद्रावक अंत, वाचा काळीज पिळवटून टाकणारी घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२३ । कानुमातेच्या उत्सवासाठी आलेल्या महिलेचा काळाने घात केला आहे. विद्युत वजन काट्याचा शॉक लागून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गंगापूर येथे घडलीय. भारती घनश्याम पाटील (रा. गंगापुरी ता. धरणगाव), असे मयत विवाहितेचे नाव असून या घटनेनंतर चिमुरड्यांचा आक्रोश पाहून संपुर्ण गावकऱ्यांचे काळीज पिळवटून गेले आहे.

नेमकी काय आहे घटना?
सुरत येथे वास्तव्यास असलेले घनश्याम रायभान पाटील हे आपली पत्नी ४ वर्षाची मुलगी आणि १० वर्षाच्या मुलासह कानबाईच्या उत्सवासाठी आपल्या गावी आले होते. रविवारी सकाळी ते आई-वडिलांसोबत शेतात भेंडी तोडायला गेले होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घरात भारतीबाई यांच्या लहान मुलांनी रडत-रडत आरडा ओरडा करायला सुरुवात केली. मावशी, काकू आमची आई बेशुद्ध पडलीय, लवकर या. मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या संगिता संजय पाटील यांनी घरात जाऊन पाहिले असता भारती पाटील ह्या जमिनीवर पडलेल्या होत्या.
रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाची नाती महत्वाची, प्रणिती शिंदेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला

हाका मारल्यानंतर काहीजण आले. त्यांनी पाहिले असता भारती पाटील यांच्या हातात ईलेक्ट्रीक वजन काट्याची ईलेक्ट्रीक पीन होती. विजेच्या धक्क्यामुळे भारती पाटील ह्या बेशुद्ध पडल्याचे लक्षात आले. गावकऱ्यांनी मिळून भारती पाटील यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी धरणगाव पोलिंसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर शिंदे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button