---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू ; माहेजी रेल्वे स्टेशन नजीक घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२३ । धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी जळगाव तालुक्यातील माहेजी रेल्वे स्थानकजवळ घडलीय. याबाबत जळगाव लोहमार्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे.

train crime jpg webp

जळगाव तालुक्यातील माहिजी रेल्वे स्थानक जवळील रेल्वे खंबा क्रमांक ३८५ / १३ जवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत माहिजी रेल्वे स्टेशन प्रबंधक यांनी या घटनेची माहिती जळगाव लोहमार्ग पोलीसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.

---Advertisement---

यात मयताची कोणतीही ओळख पटलेली नाही. याबाबत जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांना जळगाव लोहमार्ग पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक हिरालाल चौधरी हे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---