जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । जळगाव येथील एका १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर गेल्या ४ वर्षापासून अत्याचार करत त्याच अत्याचारातून पिडीतीने ३ दिवसांपूर्वीच मुलास जन्म दिला. दरम्यान, त्या बाळाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला आहे.
वेळेच्या आधीच प्रसूती झाल्यामुळे मुल व माता दोघांची प्रकृती खराब झाली होती. त्यात बाळाचा मृत्यू झाला. तर आईवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अत्याचार करणारा अजय राजू भालेराव याच्या विरुद्ध ५ ऑगस्ट रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.