शिधापत्रिका असूनही डीलर रेशन देत नाहीय? अशी करा तक्रार
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । गरिबांना मदत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यात शिधापत्रिकाद्वारे गरिबांना अन्नधान्य पुरविले जात आहे. रेशनकार्डच्या मदतीने सरकार गरिबांना मोफत किंवा कमी दरात रेशन पुरवते. मात्र, काही वेळा लोकांना रेशन मिळण्यातही अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा डीलर रेशन कार्डधारकांना धान्य कमी देतात किंवा देण्यास टाळाटाळ करतात. अशा परिस्थितीत शिधापत्रिकाधारकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्यासाठीही सरकारने ठोस व्यवस्था केली आहे. कोणत्याही डीलरने रेशन देण्यास नकार दिल्यास त्याची तक्रार करता येईल.
शिधापत्रिका असूनही पात्र लोकांना रेशन मिळत नसेल, तर ऑनलाइन तक्रारही करता येईल. राज्याच्या संबंधित वेबसाइटला भेट देऊन आणि ईमेलद्वारे तक्रारी करता येतील. जेव्हा तुम्ही तक्रार कराल तेव्हा रेशन कार्ड क्रमांकासह तुम्हाला रेशन डेपोची माहिती द्यावी लागेल.
तक्रार करण्याचे अनेक मार्ग आहेत
याशिवाय, संबंधित राज्य सरकारांचे स्वतंत्र ईमेल आयडी देखील असतील. जिथे तुम्ही ईमेलद्वारे रेशन न मिळाल्याची तक्रार करू शकता. त्याचबरोबर रेशनकार्डशी संबंधित राज्याच्या वेबसाइटला भेट देऊन आणि टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही तक्रार करता येईल.
तक्रार कशी करायची
महाराष्ट्रासाठी 1800-22-4950 हा टोल फ्री हेल्पलाइन नंबर आहे. यावर देखील तुम्ही तुमची तक्रार करू शेतात.