⁠ 
सोमवार, जानेवारी 6, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | अन्यथा होणार कारवाई.. जळगावकरांना फटाके फोडण्यासाठीची ‘डेडलाइन’ जारी

अन्यथा होणार कारवाई.. जळगावकरांना फटाके फोडण्यासाठीची ‘डेडलाइन’ जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२३ । देशासह राज्यातील अनेक शहरांमधील हवा गुणवत्ता खालावली असून राज्यातील वाढतं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काही दिवसापूर्वी राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील वायू प्रदूषण होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याचे आदेश प्राप्त झाल्यामुळे शहरात १२५ डेसिबलच्यावर आवाज असलेल्या फटाक्यांना बंदी घालण्यात आली आहे.

जर कोणी १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके विक्री करताना किंवा फोडताना आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, तसेच सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके फोडावेत, अशी माहिती महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अश्विनी भोसले- गायकवाड यांनी दिली.

महापालिकेच्या नवव्या मजल्यावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त अश्‍विनी भोसले म्हणाल्या, की शहरात रात्री सात ते दहापर्यंतच कमी आवाजातील फटाके येतील; परंतु मोठ्या आवाजाचे फटाके फोडताना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलिस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल.

तसेच बांधकामाचे काम करताना मालमत्ताधारकाने त्या बांधकाम क्षेत्राला आजूबाजूने पत्रा किंवा ग्रीन नेटच्या सहाय्याने झाकणे गरजेचे आहे. त्यामुळे उडणारी धुळ हवेत मिसळू नये, याची दक्षता मालमत्ताधारकाने घ्यावी, तसेच वेस्ट मटेरिअलची वाहतूक करताना देखील ते झाकणे आवश्यक असून, उघड्यावर टायर, कचरा, प्लास्टिक जाळणे हा कायद्याने गुन्हा आहे.

त्यामुळे कोणी असे कचरा, टायर, प्लास्टिक जाळताना आढळून आल्यास त्यांना दहा हजार रुपये दंड आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना गोवऱ्या, गॅस दाहिनी किंवा इलेक्ट्रिक दाहिनीचा वापर करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.