⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | रेल्वेचा 30 जूनपर्यंत ब्लॉक! भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, ‘या’ गाड्यांच्या मार्गात बदल

रेल्वेचा 30 जूनपर्यंत ब्लॉक! भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, ‘या’ गाड्यांच्या मार्गात बदल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२४ । भुसावळ मार्गे पुण्याकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दौड आणि मनमाड विभागातील पुणतांबा आणि मनमाड स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी रेल्वेने १७ ते ३० जून या दिवसांच्या काळात १४ दिवसांचा ब्लॉक घेतला आहे. यामुळे १४ गाड्या रद्द, ५ गाड्या उशिराने धावतील, याशिवाय ४ गाड्यांचे मार्ग बदल आणि ४ गाड्या शॉर्टटर्मिनेट केल्या आहेत.

विभागातून धावणारी वीरांगना रानी लक्ष्मीबाई झाशी- पुणे विशेष गाडी १९ व २६ जूनला रद्द, पुणे झाशी गाडी २० व २७ या दिवशी रद्द असेल. विलंबाने सुटणाऱ्या गाड्यांमध्ये पुणे लखनऊ साप्ताहिक सुपरफास्ट १८ व २५ जूनला ९० मिनिटे, पुणे-हटिया द्वि साप्ताहिक सुपरफास्ट १९ व २६ जूनला ९० मिनिटे, अमरावती – पुणे हुतात्मा एक्सप्रेस २० व २३ जूनला १० मिनिटे, बंगळुरू नवी दिल्ली कर्नाटक २९ जूनला २ तास, नवी दिल्ली बंगळुरू कर्नाटक सुपरफास्ट २३ व २८ जूनला १० मिनिटे विलंबाने सुटेल

पुणे-अमरावती हुतात्मा एक्सप्रेस १९, २०, २१ आणि २४ ते २८ जूनपर्यंत पुण्यातून १० मिनिटे विलंबाने सुटे. अमरावती पुणे हुतात्मा एक्स्प्रेस २० व २१ जूनला १० मिनिटे, बंगळुरू नवी दिल्ली कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेस २९ जूनला २ तास, नवी दिल्ली- बंगलुरू कर्नाटक सुपरफास्ट २३ व २८ जूनला १० मिनिटे विलंबाने सुटेल, असे सूत्रांनी सांगितले याशिवाय विभागातून न जाणाऱ्या इतर चार गाड्या विलंबाने धावतील

या गाड्यांच्या मार्गात बदल
जम्मूतवी-पुणे झेलम एक्सप्रेस २७ व २८ जूनला मनमाड, कोपरगाव, नगर दौड कॉर्डलाईन ऐवजी इगतपुरी, कल्याण, पनवेल मार्गे पुण्याला जाईल. हजरत निजामुद्दीन – वास्को गोवा सुपरफास्ट २८ व २९ जूनला मनमाड, कोपरगाव, नगर दौंड कॉर्डलाईन ऐवजी इगतपुरी, कल्याण, पनवेल, पुणे मार्गे पुढे जाईल.

या गाड्या केल्या शॉर्ट टर्मिनेट
सिकंदराबाद- साईनगर शिर्डी द्वि साप्ताहिक एक्सप्रेस २८ जूनला मनमाड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट असेल, म्हणजे ही गाडी फक्त मनमाडपर्यंत धावेल. पुढे शिर्डीपर्यंत रद्द राहील. परतीच्या प्रवासात साईनगर शिर्डी-सिकंदराबाद द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस २९ जूनला शिर्डएिवजी मनमाडहून निर्धारित वेळेत सुटेल. अप पुरी-साईनगर शिर्डी साप्ताहिक सुपरफास्ट २८ जूनला मनमाडपर्यंत धावेल, डाउन साईनगर शिर्डी- पुरी साप्ताहिक जूनला शिर्डी ऐवजी मनमाड येथून नियोजित वेळेत सुटेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.