---Advertisement---
यावल

यावल परिसरात वादळी पावसामुळे मोठे नुकसान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । सावदा (वार्ताहर) – आज दिनांक ३१ चे संध्याकाळी ५ वाजेदरम्यान झालेल्या वादळ व अल्प पावसामुळे कूभारखेडा ,चिनावल गाव व परिसरात शेती शिवारात केळी सह अन्य पिकांचे तसेच गावात विजेचे पोल ,तार व मोठं मोठे झाडे उन्मळून पडल्याने शेतकरी ,ग्रामस्थाचे मोठे नुकसान झाले आहे.

केळी चे खोंड उन्मळून पडल्याने केळी उत्पादकांच मोठे नुकसान झाले आहे तसेच कुभारखेडा ,चिनावल गावठाण परिसरात विजेचे पोल व तारा उन्मळून पडल्याने काही काही काळ विज पुरवठा विस्कळीत झाला होता दरम्यान ज्या केळी उत्पादकांचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केळी उत्पादकांनी केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---