जळगाव लाईव्ह न्यूज । श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात दहीहंडी समारंभ व स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने आणि मानवी पिरॅमिडच्या रोमांचक थराराने संपूर्ण महाविद्यालय परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते दहीहंडीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दहीहंडी फोडण्यासाठी महाविद्यालयातील विविध शाखांच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी उत्साहाने विविध गट तयार केले. प्रत्येक गटाने आपल्या संघभावनेचे, धाडसाचे आणि एकजुटीचे दर्शन घडवत मानवी मनोरे उभारून दहीहंडी फोडण्याचे आव्हान स्वीकारले.

एकापाठोपाठ एक उभारले जाणारे मानवी पिरॅमिड, सहकार्यांचा उत्साहवर्धक जल्लोष आणि दहीहंडी फोडण्याचा क्षण यामुळे वातावरणात प्रचंड उत्साह निर्माण झाला.दहीहंडी चे विजेते ग्रुपडिफॉल्डर ग्रुपराधा राणी ग्रुपबजरंग ग्रुपडॉमिनेटर ग्रुपमेकॅनिकल इलेक्ट्रिकल ग्रुप विजेत्या ग्रुपला महाविद्यालयाकडून ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.या स्पर्धेत विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘एकीचे बळ आणि संघभावनेची ताकद’ याचा सुंदर प्रत्यय दिला. पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक विद्यार्थी जीवन यांचा सुरेख संगम घडवणार्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह आणि आपलेपणाची भावना अधिक वृद्धिंगत झाली.
या उत्साहपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा उल्हास पाटील, सदस्य डॉ. केतकी उल्हास पाटील तसेच डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डियालॉजी) यांनी आयोजक, प्राध्यापकवर्ग आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.सदर दहीहंडी कार्यक्रमाचे नियोजन प्रा. नकुल गाडगे यांनी केले, तर प्रा. अमित म्हसकर यांनी आपल्या प्रभावी आणि उत्साही सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली.विद्यार्थ्यांचा उत्साह, संघभावनेची ताकद आणि श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा आनंद यांचा अनोखा संगम असलेला हा दहीहंडी सोहळा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा अविस्मरणीय क्षण ठरला!






