वाळूमाफियांची दबंगगिरी : शासकीय विश्रामगृहातून जप्त केलेले ५ ट्रॅक्टर लांबविले

जून 11, 2022 10:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । विना परवाना वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करण्यात आलेले ५ ट्रॅक्टर शासकीय विश्रामगृहातून लंपास केल्याची घटना भडगाव येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

crime 18 jpg webp

भडगाव येथील महसूल पथकाने विना पास गौणखनिज वाळू वाहतूक केल्याप्रकरणी ५ ट्रकटर जप्त केले होते. दंडात्मक कारवाईसाठी येथील शासकीय विश्रामगृहातून लावण्यात आले होते. सदर ट्रकटर आरोपीने दंड न भरता व तहसीलदारच काही एक न सांगता लांबविले. या प्रकरणी भडगाव पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार आरोपी भावडू सुभाष वाघ, सुनील शिवाजी गंजे, आबा नामदेव मराठे, ऋषिकेश राजेंद्र देसले हे चार भडगाव येथील तर संदीप विश्वनाथ पवार ता. पाचोरा यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. तपास सोफ संजय माधवराव काळे करीत आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now