⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | हवामान | Cyclonic Storm : वर्षातील पहिले वादळ देशाच्या या किनारपट्टीला धडकू शकते, यलो अलर्ट जारी

Cyclonic Storm : वर्षातील पहिले वादळ देशाच्या या किनारपट्टीला धडकू शकते, यलो अलर्ट जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । देशाच्या किनारी भागात अनेकदा चक्रीवादळाचा धोका असतो. अशा स्थितीत हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, देशाच्या पूर्वेकडील राज्याला वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या वादळाचा सामना करण्यासाठी 18 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे वादळ पुढील आठवड्याच्या सुरुवातीला ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकू शकते.

एनडीआरएफ आणि ओडीआरएएफची टीम तैनात
दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्या लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर शनिवारपर्यंत हवामान प्रणाली उत्तर-पश्चिमेकडे सरकून दाब क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे. या संदर्भात, एनडीआरएफच्या 17 टीम आणि ओडिशा आपत्ती रॅपिड अॅक्शन फोर्स (ओडीआरएएफ) च्या 20 टीम कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

‘फानी’, ‘अम्फान’ आणि ‘यास’ नंतर नवा धोका
IMD नुसार, यामुळे पुढील आठवड्यात मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या समुद्र परिसरात गेल्या तीन उन्हाळ्यात सतत चक्रीवादळे येत आहेत. अशा परिस्थितीत वेळीच इशारा दिल्याने यावेळी कमी नुकसान अपेक्षित आहे. यापूर्वी 2021 मध्ये ‘यास’, 2020 मध्ये ‘अम्फान’ आणि 2019 मध्ये ‘फनी’ने ओडिशात धडक दिली होती.

या संदर्भात आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकून आग्नेय बंगालच्या उपसागरातील दाब क्षेत्रात आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्री वादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. जे 10 मे पर्यंत संबंधित भागात पोहोचू शकतात. हे चक्रीवादळ कोणत्या भागात धडकणार याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मच्छिमारांसाठी सूचना
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग 80-90 किमी प्रतितास असेल. त्यामुळे समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांमुळे 9 मेपासून मच्छिमारांनी समुद्र परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अग्निशमन सेवेचे डीडीएसके उपाध्याय म्हणाले की, अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.