जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२५ । जळगाव महापालिकेसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आता अवघे काही वेळ शिल्लक असल्याने इच्छुक उमेदवार आणि समर्थकांची महापालिकेच्या आवारात प्रचंड गर्दी झालीय. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांची तसेच उमेदवारांची धावपळ या ठिकाणी उडताना दिसत आहे.

जळगाव शहरातील १९ प्रभागातील ७५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच ३० डिसेंबर असून आता अर्ज करण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहे. सकाळपासूनच महापालिका प्रशासनाच्या वतीने अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, दुपारी ३ वाजेपर्यंत ही मुदत असणार आहे.

आज सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह महापालिका आवारात मोठी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारात पहिल्या गेटमधून उमेदवार व त्यांच्यासोबत दोन जणांना सोडण्यात येत आहे तर दुसऱ्या गेटमधून महापालिकेचे कर्मचारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने प्रत्येक उमेदवाराचा अर्ज अचूकपणे स्वीकारण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय सध्या हालचालींचे केंद्र बनले आहे.










