बातम्यामहाराष्ट्र

1 रुपयात मिळणार पिकविमा होणार बंद? जळगावात आढळले तब्बल ‘एवढे’ बोगस अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२५ । महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक रुपयात पिकविमा योजना (Crop Insurance Scheme) ही एक महत्वाची मदत ठरली आहे, परंतु या योजनेत गैरव्यवहार (malfeasance) झाल्याची प्रकरणं उघडकीस आली असून आता ही योजना बंद करण्याबाबतची शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं राज्य सरकारला (State Govt) दिल्याची माहिती आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत होता, कारण विमा हफ्ता सरकार भरणार असल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त एक रुपया द्यावा लागत होता. मागच्या वर्षी १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. परंतु आता या योजना बंद होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एका समितीने शेतकऱ्यांना १ रुपयांत पिकविमा योजना बंद करून त्या ऐवजी एका पिकविम्याच्या अर्जामागे किमान १०० रुपये भरावे अशी शिफारस समितीने केलेली आहे. त्यामुळे आता यावर महायुती सरकार काय निर्णय घेईल हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सर्वाधिक बोगस अर्जदार असलेले जिल्हे कोणते?
दरम्यान, या योजनेचा गैरफायदा घेत बीडमध्ये सर्वाधिक १ लाख ९ हजार २६४ बोगस अर्ज करण्यात आलेले आहेत.
तर सातारा – 53 हजार 137, जळगाव – 33 हजार 786, परभणी – 21 हजार 315, सांगली – 17 हजार 217, अहिल्यानगर – 16 हजार 864, चंद्रपूर – 15 हजार 555, पुणे – 13 हजार 700, छत्रपती संभाजीनगर – 13 हजार 524 शेतकऱ्यांचे बोगस अर्ज आढळून आले आहेत.

ओडिशा सरकारने योजना बंद केली
ओडिशामध्येही पीक विमा घोटाळ्याचे अनेक प्रकार समोर आले होते. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झाले. यावर पर्याय म्हणून ओडिशा सरकारने योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. यातच आता महाराष्ट्रात ही योजना वादग्रस्त ठरत असल्यामुळे योजना बंद करण्याची मागणी होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button